डोंबिवलीतील गार्डनमध्ये होणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली -

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

डोंबिवलीतील गार्डनमध्ये होणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली -

LOKSANDESH NEWS 




डोंबिवलीतील गार्डनमध्ये होणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली



डोंबिवलीतील सुनिलनगरमध्ये कवित्री बहिणाबाई चौधरी गार्डनमध्ये तयार करण्यात येणाऱ्या वाचनालयावरुन शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे. लहान मुलांसाठी असलेल्या या बगिच्यात वाचनालय झाले तर लहान मुले काय करतील? आम्ही अजिबात वाचनालय होऊ देणार नाही. याला स्थानिक नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे.

 तर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सुसज्ज वातानुकूलीत आधुनिक वाचनालय आम्ही तयार करतोय, खासदारांची २५ लाखाचा निधी दिला आहे. काही लोकांचे पोट दुखते आहे. ते लोक अनधिकृत जाहिराती आणि वाचनालयावर का बोलत नाही असा शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी केला आहे. मात्र, आता या मुद्यावर डोंबिवलीत राजकीय वातावरण तापले आहे. 

      डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगरमध्ये गार्डन आहे. या गार्डनमध्ये लहान मुले, महिला, वयोवृद्ध येतात. या गार्डनमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून सुसज्ज असे वाचनालय तयार होणार आहे. या कामाची पाहणी रविवारी काही अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. 

हे काम शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून होणार आहे. या वाचनालयाच्या कामाला स्थानिक नागरिकांसह शिवसेना ठाकरे गटाने प्रचंड विरोध केला आहे. शिवसेना शहर प्रमुख अभिजीत सावंत यांचे म्हणणे आहे की, हे गार्डन लहान मुलांसह वयोवृद्धांसाठी आहे. एखादे वाचनालय तयार झाले तर हे गार्डन लहान होईल. गार्डनचा काही फायदा होणार नाही.

 त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली वास्तू तोडण्यात येईल. या गार्डनला आम्ही विरोध केला आहे. हे गार्डन आम्ही होऊ देणार नाही. अशी भूमिका काही नागरिकांनीही घेतली आहे. या बाबत शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांचे म्हणणे आहे की, आम्ही नागरिकांना विचारुन हा प्रस्ताव केला आहे. २५ लाखातून सुसज्ज असे गार्डन तयार होणार आहे. त्यात अत्याधुनिक सर्व सोयी सुविधा असणार आहे. काही लोकांचे पोट दुखते आहे.

 त्यामुळे ते विरोधाची भूमिका घेत आहेत. गार्डनच्या परिसरात अनधिकृत बॅनर बाजी सुरु आहे त्यावर का बोलत नाही? होणारे वाचनालय अधिकृत आहे आणी ते होणारचं. आता या मुद्यांवरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे. 



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली