बँकेत मराठी भाषेच्या वापराबाबत मनसे आक्रमक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठीचा मुद्दा मांडत बँका तसेच आस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर होतो की नाही हे पाहण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. या आदेशानंतर मनसे आक्रमक झाली आहे.
मनसे कल्याण शहर शाखेच्या वतीने आज कल्याण मधील बँकांना प्राधान्याने मराठीच्या वापराबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्याकडून बँकांना मनसे लिहिलेले पेपर वेट भेट देण्यात आले.
यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी रिझर्व बँकेच्या नवीन गाईडलाईन्स प्रमाणे बँकेचे व्यवहार मराठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दैनंदिन कामकाजात मराठी भाषेला प्राधान्यक्रम द्या , बँकेतील कर्मचाऱ्यांनी देखील मराठी शिकून घ्या, आम्ही दिलेले पेपरवेटचे वजन इतर भाषांवर ठेवा आणि मराठीला प्राधान्य द्या. येत्या पंधरा दिवसात बँकेतील व्यवहार मराठीत झाले नाहीत तर हेच पेपरवेट कुठे कुठे लागतील याला आम्ही जबाबदार नसून, असा इशारा देखील मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिलाय.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली