LOKSANDESH NEWS
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ चांदवड येथे मूक मोर्चा आंदोलन, चांदवड शहर कडकडीत बंद
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवड येथील सकल मराठा समाजाने हिंदू मूक मोर्चा सकाळी 9 वाजेच्या सुमारास काढण्यात आला. यावेळी चांदवड येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहाला जवळ सर्व एकत्रित जमा होऊन मोर्चा गावातून व नगरपालिका ते श्रीराम रोड, शिवाजी चौक, सोमवार पेठ ,आठवडे बाजार तळ, चांदवड पोलीस स्थानकात नेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.
यावेळेस सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकामध्ये पाकिस्तानाचा ध्वज जाळून निषेध केला. यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच जम्मू-काश्मीर या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.