LOKSANDESH NEWS
पिक विम्याच्या मागणीसाठी नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक
पीक विम्याच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पीक विमा कार्यालयात जोरदार घोषणाबाजी करत, आंदोलन सुरू केले आहे. २०२३ आणि २०२४ या २ वर्षाचा पीक विमा अद्याप ही, शेतकऱ्यांना मिळाला नाही आहे.
जवळपास ९०० कोटी रुपये पिका विमा थकीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. या बाबत अनेकवेळा निवेदन आणि आंदोलन करून ही पीक विमा कार्यालयाकडून उडवाउडवीचे उत्तर दिले जातं आहे.
त्यामुळे आज शेतकऱ्यांनी पीक विमा कार्यालयातील व्यवस्थापकाच्या दालना समोर आंदोलन केले.
जो पर्यंत पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे.