किरकोळ फी साठी शाळा प्रशासनाने रोखली परीक्षा, धुळे शहरातील नवजीवन इंग्लिश स्कूल येथील घटना
एकीकडे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शासनाकडून अनेक नवीन योजना तयार करण्यात आल्या आहेत तर दुसरीकडे अनेक खाजगी शाळांमध्ये दरवर्षी फी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. आणि याच फी मुळे विद्यार्थ्यांना ऐन परीक्षा वेळीस नाहक त्रास करावा लागतो.
धुळे शहरातील साक्री रोड परिसरात असलेल्या नवजीवन इंग्लिश मीडियम स्कूल येथे काही विद्यार्थ्यांच्या फी बाकी असल्यामुळे त्यांना ऐन परीक्षा वेळेस शाळा प्रशासनाने परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांच्या पालकांचे पगार हे पुढील काही दिवसात होणार असल्याने फी भरली न गेल्याने पालकांमधून रोष व्यक्त होत आहे, ऐन परीक्षेच्या वेळी फी च्या कारणामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याने पालकांनी याबाबत रोष व्यक्त केला आहे.
तसेच शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना सांगण्यात आले की, ज्यावेळेस तुम्ही फी भराल त्यावेळेस तुमची परीक्षा घेण्यात येईल असा अजब फतवा शाळा प्रशासनाने काढल्यामुळे पालकांमधून रोष व्यक्त होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली