LOKSANDESH NEWS
राज्य शासन संवेदनशील असेल तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या - जयश्री शेळके
राज्यभरात दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातही वादळी वाऱ्यामुळे आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील 166 गावांमध्ये घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले आहे.
ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की कर्जमाफी करू निवडून आल्यानंतर त्याच सरकारचे प्रतिनिधी आता हात वर करतायेत आणि सांगताहेत की कर्जमाफी केली जाणार नाही. आधीच शेतकरी सुलतानी संकटात सापडलेला असताना शेतीमालाला भाव नसताना आता पुन्हा शेतकरी बांधव अस्मानी संकटात सापडलेला आहे.
हाताशी आलेली पिक ही गमवावी लागलेली आहे. राज्य शासन थोडेफार संवेदनशील असेल तर तातडीने नुकसानीचे सर्वे करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या जयश्री शेळके यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली