LOKSANDESH NEWS
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार दौऱ्यानिमित्त बुलढाणा झाले भगवे
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यभर सुरू केली आहे. हा आभार दौरा यात्रा 27 एप्रिल रोजी बुलढाणा येथे येत आहे.
बुलढाणा शहरातील जिजामाता स्टेडियम समोरील मैदानावर सकाळी दहा वाजता शिंदेंची जाहीर सभा होणार असुन बुलढाणा शहरात ठीक ठिकाणी मोठमोठे बॅनर्स झेंडे लावण्यात आले आहे त्यामुळे बुलढाणा शहर भव्य दिसत आहे. सभेच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी शिंदे गटाने केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली