LOKSANDESH NEWS
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने पार पडली बैठक
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि आनंदाने साजरी व्हावी, यासाठी आज कल्याणच्या सनई मंगल कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला सर्व नागरिक, प्रशाकीय अधिकारी उपस्थित होते.
जयंती दिनी नागरिकांना कोणत्याही गैरसोयी होणार नाहीत. कोणी काय काम करावे याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. मागच्या वर्षीय जयंती उत्सवात ज्यांनी सहकार्य केले होते. त्यांचे अभिनंदन करुन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
सोशल मिडियावरील पोस्ट फॉरवर्ड करुन व्हायरल करु नये असेआवाहन कल्याणचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी केले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली