महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, नांदेड जिल्ह्याच्या आलेगाव शिवारातली घटना
हिंगोली जिल्ह्यातील महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या. ट्रॅक्टर मध्ये बसून या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवले आहे. मात्र, अद्यापही आठ जण विहिरीत बुडाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हिंगोली सह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालेले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला. बचाव कार्य सुरु असून, पाणी जास्त असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली