श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकावर बंदी घाला - 'पेशवा युवा मंच' ची मागणी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकावर बंदी घाला - 'पेशवा युवा मंच' ची मागणी

                                                        LOKSANDESH NEWS 





 श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकावर बंदी घाला - 'पेशवा युवा मंच' ची मागणी 




 दिनांक 25 मार्च रोजी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर "झिरो अवर्स " या कार्यक्रमात बोलताना श्रीमंत कोकाटे यांनी" संभाजीराजांची हत्या ही  मनुस्मृतीप्रमाणे झालेली आहे याला कोणताही ऐतिहासिक संदर्भ, पुरावा उपलब्ध नाही" असे विधान केलेले आहे. या संदर्भात पुढे जाऊन ते म्हणतात की जे लोक असे  म्हणतात ते माझ्या जुन्या पुस्तकाचा आधार घेतात  की ज्या पुस्तकाला कोणताही ऐतिहासिक संदर्भ, आधार, पुरावा काहीच नाही. संभाजी राजांची हत्या ही मनुस्मृती प्रमाणे झाली व त्यात ब्राह्मणांचा सहभाग होता यास कोणताही पुरावा नाही.

त्यांचा या खोट्या पुस्तकाचा आधार घेऊन काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी संभाजी राजांना ब्राह्मणांनी पकडून दिले व संभाजी राजांची हत्या ही मनुस्मृती प्रमाणे झाली होती, ती पंडित व ब्राह्मण लोकांच्या सांगण्यावरून झाली होती असे धादांत खोटे विधान या कार्यक्रमात केलेले आहे. 

वरील सर्व संदर्भ व प्रसंग लक्षात घेऊन सरकारने या इतिहासकार म्हणून घेणाऱ्या व धादांत खोटा इतिहास मांडणाऱ्या श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकांवर तात्काळ बंदी आणावी. मागेही  विद्रोही लेखकांचे मेरुमणी पुरुषोत्तम खेडेकर यानेही  "माझ्या पुस्तकांना कोणताही आधार नाही "असे कोर्टात प्रतिज्ञापत्रावर लिहून माफी मागितली होती. त्याच पद्धतीने आज या कार्यक्रमाच्या दरम्यान कोकाटेंनी आपल्या पुस्तकाला कोणताही संदर्भ नाही असे जाहीर केले आहे. त्यांनी ब्राह्मण समाजाच्या बद्दल पूर्वग्रह दूषित बुद्धीने लिखाण करून काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.

त्यामुळे जाती-जातीत तणाव निर्माण करणाऱ्या या लेखकांच्या सर्व पुस्तकांवर तत्काळ बंदी आणावी. तसेच या खोट्या पुस्तकाचा आधार घेऊन ब्राह्मण समाजाबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांचाही निषेध, ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी पेशवा युवा मंच कडून प्रशासन व सरकारकडे करीत आहोत. समाजामधील शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटना अशा या पुस्तकांमुळे निर्माण होतात. त्यामुळे मागील काळातील अशा काही घटना घडल्या असतील तर त्याचाही शोध घेऊन कोकाटेंना यासाठी जबाबदार धरून आरोपी करावे अशी मागणी पेशवा युवा मंच कडून केली जात आहे.

समाजातील शांतता, सलोखा बिघडवण्यास निमित्त ठरणारे व जाती-जातीत तेढ निर्माण करणाऱ्या, अशा या संदर्भहीन पुस्तकांचा आधार घेऊन पुढील काळात कोणतीही अप्रिय घटना कृती वा वक्तव्य घडू नये यासाठी अशा या व इतर अनेक पुस्तकांचा शोध घेऊन सरकारने त्यावर तत्काळ कायमची बंदी आणावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा पेशवा युवा मंचचे गणेश लंके यांनी यावेळी दिला. 



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली