पिक विमा संदर्भात शासनाच्या अन्यायकारक निर्णयास तात्काळ स्थगित न केल्यास तिरडी आंदोलन
राज्य सरकारने पिक विमा संदर्भात घेतलेला अन्यायकारक शासन निर्णय तात्काळ स्थगिती करावा, असे न केल्यास शेतकरी कृती समितीच्या वतीने तिरडी आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन शेतकरी कृती समितीचे महेशभाई गुजर व शेतकऱ्यांच्या वतिने देण्यात आले. झालेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे,
सदरील निर्णय हा शेतकरी विरोधी आहे. सदर निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. या निर्णयावर स्थगिती जर आली नाही, तर शासनाच्या या निर्णयावर प्रचंड रोष पिक विमा धारक शेतकऱ्यांमध्ये निर्माण होऊ शकतो.
यातील त्रुटी दूर करून योजना राबवणे, यातील ज्या रिस्क कव्हर मध्ये बदल करावा असे सुचविले आहे. जर तो काढून टाकला तर लाखो जणांना देशोधडीस लावणे, असा प्रकार यावरून दिसत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली