LOKSANDESH NEWS
नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेनेची २ लाखापेक्षा जास्त सदस्य नोंदणी होणार -
आनंदराव तिडके पाटील
आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे आमदार आनंदराव तिडके पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेना सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर राबवावी, यासाठी ही आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी आमदार यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की, येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड दक्षिण मतदार संघामध्ये शिवसेना सदस्य नोंदणी ही दोन लाखाच्या वरती केली जाईल,
असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. यावेळी आमदार महोदय यांच्या हस्ते शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली