आमरस खाताय तर सावधान! गलिच्छ जागेत सडक्या आंब्यांपासून बनविण्यात येतोय आमरस
उन्हाळ्यात आमरस म्हंटल की, खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतेचं. मात्र, बाजारात विकत मिळणारा हाच आमरस किती गलिच्छ जागेवर बनवला जातो, किती घाणेरड्या आंब्यापासून बनवला जातो हे पाहून नक्कीच आपण आमरस खातोय की आजारपणाला आमंत्रण देतोय?
याच सडक्या आंब्यांपासून याठिकाणी आमरस बनविण्यात येत होता. हे घाणेरडे आमरस नवी मुंबईतील शहरात सर्वत्र विक्री करण्यात येत होते. रोज साधारण 6 हजार लिटर आमरस बनवून त्याची विक्री याठिकाणावरून करण्यात येत होती. आमरस बनविणाऱ्या कामगारांकडे ना फूड लायसन्स ना गुमास्ता लायसन्स आहे. मात्र, तरीही बिनधास्तपणे आमरस बनविण्याचा कारखाना चालविण्यात येत होता. यासंदर्भात मनपा प्रशासनाला कळविले असता कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. हा सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ असून, या कारखान्यावर तात्काळ कारवाई करत कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली