LOKSANDESH NEWS
शरद पवारांनी आत्मनिरीक्षण करावं - आशिष शेलार
मुंबईकरांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा सेवा उपलब्ध करण्यासाठी, पायाभूत सुविधांची प्रगती वाढवण्यासाठी केले आहे
सरकारचे प्रथम कर्तव्य आहे म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सरकारने या प्रस्तावाला गती दिली
आमदार पराग शाह यांनी प्रचंड पाठपुरवठा केला आहे
ट्राफिक कंजक्शन मधून या ठिकाणी दिलासा होईल या ठिकाणी
ON उद्धव ठाकरे
तो दोन्ही पक्षांचा अंतर्गत विषय आहे
दोन्ही भावांचा प्रश्न आहे
एकाने साद दिली दुसऱ्यांनी प्रतिसाद द्यायचा की नाही हे त्या दोघांनी ठरवावं
आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत, त्या ठिकाणी आम्ही योग्य वेळी प्रतिक्रिया देऊ आणि राजकीय भूमिका घेऊ
ON शरद पवार
या विषयावरती राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्याने, हे अपेक्षित नाही
किंबहुना कोणीच करू नये
झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बळी पडलेले आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्या वर देश एकत्र आहे
पाकिस्तानच्या विरोधामध्ये अनेक लोक आहेत, भारताला अनेक लोकं समर्थन देत आहेत
यामुळे राजकीय किंवा धार्मिक विधान करणं, शरद पवार यांनी आत्मनिरीक्षण करावं
ON ब्रिज नामकरण
या सगळ्या परिसराला आंबेडकरी चळवळीचे चित्र आहे, त्याचं स्वरूप आहे
या ठिकाणी आंबेडकरांचा पुतळा हा श्रद्धास्थान आहे आणि कामगारांनी मागणी केलेली आहे आणि नागरिकांनी देखील या ठिकाणी मागणी केलेली आहे
यामुळे मी स्वतः आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत या पुलाचे नाव माता रमाई उड्डाणपूल अअसं नामकरण व्हावं यासाठी सांगणार आहे
भाजपा सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, आमदार, खासदार आहेत. रस्त्यावर उतरून काम करत असतात, रस्त्यावरील प्रश्न, आरोग्याचा प्रश्न... अशा वेळेला नाले सफाईचे काम देखील सर्व भाजप कार्यकर्ते करून घेत असतात
प्रति सभागृह घेऊन या ठिकाणी 25 वर्षे घोटाळे केलेले आहेत, याचा काय फायदा होईल?
या सभागृहाचा उपयोग मुंबईकरांचा जीवन सुखकर करण्यासाठी झाला पाहिजे. परंतु, यामधून असं वाटत नाही. कारण 25 वर्ष भ्रष्टाचार करून या ठिकाणी प्रति सभागृह खोलून काही उपयोग होईल