LOKSANDESH NEWS
शिवसेना नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची पत्रकार परिषद
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ, जुगार अनैतिक धंदे बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली हे दिसून आले आहे
- अमली पदार्थ साठा करणाऱ्या टोळीचे जाळे हे जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन प्रकारची गॅंग कार्यरत आहे. या विरोधात जनतेला सोबत घेऊन घेऊन रस्त्यावर उतरु
- जिल्ह्यातील अमली पदार्थ व अनैतिक धंदे बंद करण्याच्या दृष्टिकोनातून पालकमंत्र्यांनी जो आदेश दिला होता त्या आदेशाला पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचे सर्रास दिसत आहे
- या ठिकाणी पालकमंत्री सपशेल फेल ठरले आहेत
- जिल्ह्यात रोज अमली पदार्थ वाहतूक, अनैतिक धंदे होत आहेत
- कुडाळ तालुक्यातील पिंगुळी हे अमली पदार्थांचे हब बनलेले आहे
- कुडाळमधून अमली पदार्थांचा पुरवठा केला जात आहे
- मात्र, पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत
- एमआयडीसी येथे अनेक परप्रांतीय भंगारच्या नावाखाली ड्रग्ज, दारूचा धंदा मोठ्या प्रमाणात करत आहेत. आलिशान गाड्यांमधून ही वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असताना पोलीस यंत्रणेतून कोणतीच कारवाई होत नाही
- दिवसाढवळ्या सुरू असणाऱ्या या अमली पदार्थ वाहतुकीला पोलिसांची भीती नसल्याचे चित्र यावेळी दिसत आहे
- जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशा तीन गँग या ठिकाणी वावरत आहेत
- पालकमंत्री यांच्या आदेशानुसार मधल्या काळात जुगार आठ दिवस बंद केला गेला. मात्र, हाच जुगार मटका पुन्हा जोमाने सुरू असून आजची तरुण पिढी ही व्यसनाधीन झाली आहे
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली