LOKSANDESH NEWS
पहेलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांसह, कर्मचाऱ्यांनाही मोबाईल बंदी
पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंढरपुरातील विठ्ठल मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या सामान, बँग, पर्स यांची कसून तपासणी केली जात आहे.
भाविकांसह , कर्मचारी यांना मोबाईल आणि इलेक्ट्रिक वस्तू बंदी करण्यात आली आहे. मंदिरामध्ये येणारे केवळ दोनच दरवाजे उघडे ठेवण्यात आले आहेत. इतर सर्व दरवाजे सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आले आहेत. एकंदर मंदिराची सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली