LOKSANDESH NEWS
देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का ? - हर्षवर्धन सपकाळ
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. मंगळवारी रात्री ते मुंबईकडे रवाना होण्यासाठी शेगाव येथील रेल्वे स्टेशनला आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळा निर्मिती संदर्भात वाद-विवाद सुरु आहे. यावर ते म्हणाले कि, काही मंडळी बदनामी कारण लिखाण आणि चुकीचा इतिहास पसरवण्याच्या प्रयत्नात आहेत. राम गणेश गडकरी यांच्या पूर्वी वाघ्या कुत्र्याचा संदर्भ कोठे हि झालेला नाही. ऐतिहासिक स्वरूपाचे तथ्य तपासणे आवश्यक आहे. एकंदरीत जो इतिहास आहे त्याचा शासनाने विचार करावा आणि समाजापुढे मांडावा. त्यातूच निर्णय घ्यावा. इतिहासाचं विकृतीकरण गेल्या अनेक दिवसांपासून केल्या जात आहे. सोबतच शिवाजी महाराजांबद्दल जे अक्षम्यस्वरूपाचे लिखाण केलेल्या ज्या प्रउर्त्ती आहे. त्यांचा देखील पर्दाफाश झाला पाहिजे. मज्जाव थॉट्स या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजबद्दल आणि सावरकरांनी त्यांच्या लिखाणात जे विकृत स्वरूपाचं लिखाण केले आहे त्या पुस्तकावरही बंदी घालायला पाहिजे.
देवेंद्र फडणवीस गजनी आहेत का ? अशी टीका पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ते म्हणाले की, खडकपूर्णाच्या डाव्या कालव्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मंजुरात देऊन त्याला सुप्रमाही प्रदान केली होती त्या घटनेचा मी सुद्धा साक्षी आहे. आणि आता ते म्हणतात की ते पाणी दिल्या जाऊ शकत नाही. त्यांचा हे जर विधान असेल तर त्यांनी एकदा तपासून बघावं तेव्हाचे तत्कालीन आमदार शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने फडणवीस यांनी त्यांना हे गिफ्ट दिलं होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर डावा कालवा मंजूर केला होता. आता चक्क ते दिलेल्या आश्वासनावर आणि साइन केलेल्या फाईलवरून ते गुंजाळ करीत असतील तर त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा. अथवा त्यांना गजनी म्हटल्याशिवाय आमच्याजवळ दुसरा पर्याय राहणार नाही असे ते म्हणाले.
१ एप्रिल पासून नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्ग वरील टोल मध्ये 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की,एकंदरीत जे शासन आहे ते जुलमी सरकार आहे. सत्तेवर येत असताना वारंवार आश्वासने दिली. आता टोल काय सर्वच वाढणार आहे याचं हे सुतवाच आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली