सीतामाई तलाव फुटला; लाखो लिटर पाणी वाया

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सीतामाई तलाव फुटला; लाखो लिटर पाणी वाया

LOKSANDESH NEWS 


                                           सीतामाई तलाव फुटला; लाखो लिटर पाणी वाया 




दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप मधील सीतामाई तलावाचे पोकलेनने दुरुस्तीचे काम करताना तलावाचा बांध मधोमध फोडल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले. यामुळे मंद्रुप-निंबर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतांना तळ्यासारखे स्वरूप आले. मंद्रुप मधील सीतामाई तलावाचे आयुष्य संपल्याने बांधाला भेगा पडत आहेत.

 यामुळे त्याच्या दुरुस्तीचे काम मृद - जलसंधारण विभागाने सुरू केले आहे. तलावाचे मंजूर झालेले एक कोटी ८५ लाख रुपयांचे हे काम पृथ्वी लँडमार्क कंपनी करत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तलावाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यामध्ये खालपासून नव्याने तलावाच्या बांधाचे काम सुरू आहे. एका बाजूचे पोकलेनच्या सहाय्याने काम सुरू होते. एका बाजूने पाणी काढताना काम करणाऱ्या कामगाराने मोठी चर खोदली.

यामुळे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले. बघता बघता पाण्याचा प्रवाह वाढला. अर्ध्या तासात निम्बर्गी रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी थांबले. शेताला तलावाचे रूप आले होते. दरम्यान, सीतामाई तलाव फुटल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. समाज माध्यमातून ऐन उन्हाळ्यात पाणी वाया गेल्याची चर्चा सुरू झाली. मंद्रुप आणि इंदिरानगरमधील तरुणांनी तलावाकडे धाव घेतली. फुटलेला तलाव आणि वाहून जाणारे पाणी पाहण्यासाठी एकच गर्दी झाली.दुरुस्तीचे काम करताना तलाव फोडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले.



 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली