LOKSANDESH NEWS
सांगलीत पहिल्यांदाच श्री.साईबाबा यांनी स्वतः वापरलेल्या पादुकांचे होणार दर्शन : दोन्ही दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन.
सांगलीत पहिल्यांदाच श्री.साईबाबा यांनी स्वतः वापरलेल्या पादुकांचे दर्शन होणार आहे. दिनांक 10.4.2025, व 11.4.2025 रोजी विश्रामबाग सांगली येथील श्री साई शिखर मंदिर चाणक्य पुरी एसटी कॉलनी येथे पादुकांचे आगमन होणार आहे,
अशी दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,
तसेच आपण सर्व पंचक्रोशीतील भक्तांनी उत्साहात आनंदात श्री साईबाबांचे स्वागत करूया व दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घ्या असे आवाहन श्री साईबाबा शिखर मंदिर चाणक्यपुरी राजेंद्र पाटील यांनी केले आहे,
त्यावेळी गौरी आपटे,राजेंद्र पाटील, राहुल ढोपे-पाटील, आर एस भोसले, रवींद्र भोसले, रमेश भोसले, इत्यादी उपस्थित होते....
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली