LOKSANDESH NEWS
संभाजी ब्रिगेड संघटनेला शिवधर्म फाउंडेशनचा इशारा
शिवधर्म फाउंडेशन कडून आज पुण्यामध्ये संभाजी ब्रिगेड संघटनेच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चा वेळी शिवधर्म फाउंडेशन कडून संभाजी ब्रिगेड या संघटनेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख लवकरात लवकर थांबवावा, व त्यांना ते शक्य नसल्यास त्यांनी आपल्या संघटनेचे नाव बदलावे, अशी मागणी या मोर्चा वेळी शिवधर्म फाउंडेशनच्या अध्यक्षांकडून करण्यात आली.
लवकरात लवकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आदराने बोला, नाहीतर आम्ही 36 जिल्ह्यात 36 आंदोलने करू असा इशारा सर्व शिवप्रेमींकडून देण्यात आला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली