बँकेत मराठीचा होणारा अनादर तत्काळ थांबवावा; धुळ्यात मनसे आक्रमक
देशातील प्रांतनिहाय असलेल्या भाषेचा आदर करून बँकांनी मातृभाषेच्या आधारावर फलक लावण्याचे आदेश आरबीआय बँकेकडून देण्यात आले आहे. या आदेशाची पायमल्ली होत असल्याने धुळ्यात मनसेने शहरातील विविध बँकांमध्ये जाऊन तत्काळ नियम पाळा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.
इंग्रजी, हिंदी तसेच प्रांतनिहाय बँकेत तेथील मातृभाषेत संवाद साधला जावा अशा सूचना आहेत. त्यानुसार मराठीतून संवाद साधला जावा. परंतु काही ठिकाणी मराठीचा अनादर होत आहे. यासाठी बँक व आस्थापना येथे मराठीचा अनादर केला जात असेल तर यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसे कडून देण्यात आला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली