अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई ची शेतकऱ्यांची मागणी
धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला चांगला फटका बसला असून जवळपास 3 हजार 75 हेक्टर वरील रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने दिला आहे.
झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाकडून आता पंचनामे देखील सुरू करण्यात आले असून सुधारित नुकसानीचा अहवाल लवकरच जिल्हा प्रशासनाकडे दिला जाणार आहे,
मात्र अद्यापही प्रशासनाचा प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचला नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. साक्री तालुक्यात देखील कांदा मका पपई शेवगा आणि आंबा या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत शासनाने जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली