शॉर्ट टर्म व्हिसावर एकही पाकिस्तानी व्यक्ती शहरात नाही – पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची माहिती
पहलगाम येथील आतंकवादी हल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, अमरावती शहरात शॉर्ट टर्म पाकिस्तानी व्हिसावर सध्या एकही व्यक्ती दाखल झालेला नाही, अशी स्पष्ट माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले की, "लाँग टर्म व्हिसावर जे नागरिक अमरावतीत वास्तव्यास आहेत, त्यांच्यावर सध्या कोणतीही कारवाई किंवा रिपोर्ट करण्याचा आदेश नाही. मात्र शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्यांना परत पाठवण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. तथापि, अमरावती शहरात सध्या अशा कोणत्याही व्यक्तीचा शहरात थेट वावर नाही.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली