सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ५ कोटी ७९ लाख रुपयांचा टंचाई आराखडा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई निवारण्यासाठी १२ गावे आणि ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७९ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून कच्चे व वनराई बंधारे बांधण्याची मोहीम दरवर्षी हाती घेण्यात येते.
त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवत नाही. मात्र, सद्यस्थितीत हवामानातील बदल, वाढलेली उष्णता पाहता जिल्ह्यात पाणी पातळी घटून काही गाव आणि वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार केला. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हयात १२ गावे आणि ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७९ लाख रुपयांचा संभाव्य आराखडा मंजूर झाला आहे, अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली.