LOKSANDESH NEWS
भिवंडी शहरातील अंजुर फाटा चौक ते अंजुर या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी
ठाणे ते भिवंडी या मेट्रो प्रकल्प 5 चे काम सुरू असून, एप्रिल 1 ते 2 या दरम्यान रात्री बंद करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून सर्व वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अंजूर फाटा ते अंजुर या भागात एमएमआरडी तर्फे ॲपकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून मेट्रो चे रेल्वे ब्रिजच्या वरती लोखंडी गार्डर टाकण्याचे काम करण्यात येणार असून, रेल्वे मार्ग देखील बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरामध्ये वाहतूक कोंडी होणार नाही.
यासंदर्भात पोलीस आयुक्त ठाणे शहर वाहतूक विभागाकडून परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. तरी या परिसरामध्ये अवजड वाहन छोटी मोठी वाहन वाहतूक विभागाकडून बंदी घालण्यात आली असून, 3 एप्रिल नंतर पुन्हा हा मार्ग सुरळीत करण्यात येणार आहे. पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे.