LOKSANDESH NEWS
पीककर्ज भरण्याकरिता पैसे नसल्याने शेतकऱ्याने चक्क आपल्या शरीरातील अवयव काढले विकायला
शेतीचे पीक कर्ज भरण्याकरिता पैसे नसल्याने वाशिम जिल्ह्यातील आडोळी येथील शेतकरी सतीश इढोळे यांनी वाशिमच्या मुख्य चौकामध्ये उभे राहून चक्क आपल्यासह कुटुंबातील व्यक्तींच्या किडनीसह इतर अवयव विकायला काढले आहेत, किडनी विकणे आहे असल्याचे पत्रकच या शेतकऱ्याने काढले असून, परिवारातील सर्व कुटुंबाचे किडनीचे दर सुद्धा त्यावर निश्चित केले आहे.
सरकार ने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन सुद्धा कर्ज माफी केली नसल्याने, आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्याने कर्जाची परतफेड करायची कुठून असा सवाल या शेतकऱ्याने उपस्तीथ केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली