चोपडा आगारात आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते पाच नवीन बसेसचे लोकार्पण
- चोपडा आगारात गेल्या अनेक दिवसांपासून नवीन बसेसची आतुरतेने वाट पाहत होते. आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नातून चोपडा आगाराला ५ बसेस नवीन मिळाल्या. माजी आमदार लता सोनवणे यांनी बसेसचे औक्षण केले. आमदार चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार लता सोनवणे यांनी फित कापून बसचे लोकार्पण करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम खेळत चंद्रकांत सोनवणे आणि लता सोनवणे व पदाधिकारी यांच स्वागत ढोल ताश्याच्या गजरात केले. तसेच आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाती बडगुजर, भाजपाचे डॉक्टर विकी सनेर, यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे विविध संस्थेवर असलेले पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली