LOKSANDESH NEWS
शेगावात जड वाहनांना बंदी घालावी, विविध सामाजिक संघटनांची मागणी
बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव शहरातील वर्दळीच्या मार्गावर जड वाहनांना बंदी घालून जड वाहतूक गावाबाहेरून वळवावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शहर पोलीस स्टेशन, नगर पालिका प्रशासनाकडे करण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी याचं ठिकाणी अपघात होऊन काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष हे जागीच ठार झाले होते.
संत गजानन महाराज समाधी मंदिर असल्याने शेगाव शहरात दर्शनासाठी असंख्य अशा प्रवासी वाहने येतात. शहरात वाहनांच्या वर्दळीचे प्रमाण वाढले आहे. अशातच शेगांव शहरातील माणिक स्टेअर्स, शिवनेरी चौक, मुरारका शाळेजवळील चौक, काशेलानी पेट्रोल पंप या रस्त्यावर कन्या शाळा, महात्मा ज्योतीबा फुले शाळा, अहिल्यादेवी होळकर न. प. शाळा, मौलाना अब्दुल आझाद शाळा, टिपू सुलतान शाळा, राष्ट्रमाता इंदीरा गांधी शाळा, ग. भि. मुरारका शाळा, ग.भी. मुरारका महाविद्यालय आहे. दररोज प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत हजारो विद्यार्थी या रस्त्याने ये जा करत असतात. आधीच या रस्त्यावर भाविक भक्तांच्या चारचाकी वाहनांची वर्दळ असते.
त्यातचं आता जड वाहने सुध्दा या रस्त्याने येत जात असून जड वाहने ही भरधाव वेगाने जाताना दिसून येतात. यामुळे या रस्त्याने ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. नुकतीच मुरारका शाळेजवळ एका भरधाव जड वाहनाने झालेल्या अपघातात इसमाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
अशा प्रकारची घटना पुन्हा भविष्यात होवू नये त्यासाठी माणिक स्टोअर्स येथून ते काशेलानी पेट्रोल पंप पर्यंत जड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात यावी, अन्यथा भविष्यात अशाप्रकारची कोणतीही घटना घडल्यास सदर घटनेस आपले पोलिस व नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील. यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विहिरीचे चंद्रकांत घोराळे, युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव, श्री शिवप्रतिष्ठानचे प्रविण मोरखडे, भाजपाचे रोहीत धाराशिवकर, मुकुंदा खेडकरआदींची एवढी उपस्थिती होती.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली