LOKSANDESH NEWS
गळ्यात मागण्यांचे बॅनर लटकवून तरुणाचं अनोखं आंदोलन
जालना मध्ये गळ्यात मागण्यांचे बॅनर लटकवून, एका तरुणांने अनोख आंदोलन केल आहे. नारायण लोखंडे असे या तरुणाचे नाव आहे. जालना शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार होत असून, शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांना कार्यरत करता येत नाही.
यात शालार्थ समन्वयक चंद्रकांत पौळ, गट शिक्षणाधिकारी संतोष साबळे आणि शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ यांनी जवळपास 1 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. यासाठी नारायण लोखंडे यांनी अनेक आंदोलन केली.
विभागीय आयुक्त यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यात शिक्षणाधिकारी अनेक चौकशांमध्ये दोषी आढळले आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या तात्काळ रद्द कराव्यात. आणि शालार्थ समम्वयक, गट शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निलंबित करण्यात यावे.
या मागणीसाठी नारायण लोखंडे यांनी जिल्हा परिषदेसमोर हे अनोख आंदोलन केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निवेदन स्विकारुन, कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली