LOKSANDESH NEWS
कर्जमाफी नको, शेतीमालाला भाव द्या शेतकऱ्यांची मागणी
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आल्यानंतर कर्जमाफी करू, अस आश्वासन दिले होते.
मात्र सरकार येऊन आता महिने उलटले, मात्र अद्याप कर्जमाफी झाली नाही. एवढ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध योजनांचा खर्च आणि सरकार वरील कर्जाचा बोजाकडे बोट दाखवत आता शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्य नसल्याचे सांगितले. सरकारने कर्जमाफी वरून हात झटकल्याने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांवर शेतकरी चांगलेच संतापले आहेत.
आता शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. आम्हाला कर्जमाफी नको. शेतीमालाला भाव द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली