ज्या पद्धतीने चांगले उपचार रुग्णांना मिळायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही - डॉ.नीलम गोऱ्हे

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

ज्या पद्धतीने चांगले उपचार रुग्णांना मिळायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही - डॉ.नीलम गोऱ्हे

LOKSANDESH NEWS 


ज्या पद्धतीने चांगले उपचार रुग्णांना मिळायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही - डॉ.नीलम गोऱ्हे



- राज्य सरकारने ज्यांना जमिनी प्रदान केलेली आहेत अशी बरीच रुग्णालये मुंबई आणि पुण्यात आहेत.

- मागच्या 10 ते 15 वर्षांपासून विधिमंडळात हा विषय नेहमीच येतोय 

- ज्या पद्धतीने चांगला उपचार रुग्णांना मिळायला पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही.

- कांही वेळेला तर रुग्ण गरीब असल्याने त्यांना प्रवेशच नाकारला जातो.

- त्यामुळे दीनानाथ रुग्णालयातील घटनेबाबत त्यांनी अहवाल दिलेला आहे.

- दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे अत्यंत संवेदनशील आणि सकारात्मक भूमिका असणारे आहेत.

- याची राज्य सरकार आणि अजित पवार यांनी ही दखल घेतलेली आहे.

- याबाबताची उच्च स्तरीय कमिटी ही नेमण्यात आलेली असून त्याचे अहवाल द्यायला सांगितलेले आहेत.

- त्या अहवालामध्ये नेमकी वैद्यकीय हेळसांड काय झाली आणि त्यांना कुठे नेण्यात आलं, यावर सरकारच्या मुद्द्यामध्ये चर्चा येईल 

- आत्ता नुकट्याच झालेल्या अधिवेशनात मे स्वतः चेअर वरून सरकारला निर्देश दिले होते,कोविडच्या काळात ज्यापद्धतीने डॅश बोर्ड वरून माहिती कळतं होती,त्याच पद्धतीने आरोग्य मंत्र्यांना माहिती मिळण्यासाठी निर्देश दिलेले आहेत.

- या पद्धतीची यंत्रणा जर पुढच्या काळात उभी राहिली तर अशा पद्धतीच्या घटना टाळता येतील.

- या संदर्भात जे जबाबदार असतील त्याच्यावर सरकार योग्य ती कारवाई करेल.

- मी स्वतः उपसभापती पदावर आहे आणि चौकशी सुरु आहे त्यामुळे कोणताही निष्कर्ष देणे योग्य नाहीये.

- अशा घटना घडणे हे अतिशय गंभीर असून याची दखल राज्य सरकारने घेतलेली आहे.

- याच्या पुढच्या काळात धर्मदाय हॉस्पिटलमध्ये सुद्धा रुग्णांना तातडीचे उपचार कसे मिळतील यावर सरकार जरूर निर्णय करेल.

- सर्वच डॉक्टर्स आणि सर्वच रुग्णालय हे रुग्णांच्या विरोधात वागतात असं म्हणणं योग्य नाहीये,अनेक ठिकाणी डॉक्टर्स रुग्णांना मदत करतात.

- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या काक्षांच्या विनंतीचा ही आदरच ठेवला जातोय.

- कोविड मधून जेंव्हा आपण बरे झालो तेंव्हा संजीवनी देणारे देव म्हणून डॉक्टरकडे पाहतो.

- काही अपप्रवृत्ती असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

- सर्वसामान्य हॉस्पिटल्समध्ये काम करणाऱ्या लोकांचं खच्चीकरण होणार नाही अशा पद्धतीचा हिंसाचार कोणी करू नये.




 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली