LOKSANDESH NEWS
माजी सहकारमंत्री आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ठोकला शड्डू
- कोण माझ्यासोबत आलं तर त्यांच्यासोबत नाही आले तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार
- भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा स्वपक्षातील नेत्यांना दिला सूचक इशारा
- तर भाजपचे दुसरे आमदार आणि मावळते सभापती विजयकुमार देशमुख यांनी निवडणुकीतून घेतली माघार
- मी भाजपचा कार्यकर्ता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्याला तिकीट मिळावे
- कार्यकर्त्यांनी उभे राहावे. त्यामुळे भाजपकडून मी उभा राहणारा आहे.
- कोण माझ्यासोबत आलं तर मी त्यांच्यासोबत आणि नाही आलं तर मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढणार
- भाजप आमदार सुभाष देशमुख यांचा स्वपक्षातील नेत्यांना सूचक इशारा
- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बाबत वरिष्ठांची चर्चा झाली नाही
- भाजप कार्यकर्त्यांना घेऊन निवडणूक लढवणार.आम्ही सगळेजण एकत्र येऊन निवडणूक लढवली तर वरिष्ठांचं काही म्हणणं नसतं.
- निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे जायचं हा विषय भाजपमध्ये गौण आहे. तुम्हाला कोणी माहिती सांगितली असेल तर ती मला सांगा तुमच्या सूत्रांची माहिती मला द्या.
- विनाकारण आमच्यात भांडण लावू नका
- मी कोणतीही निवडणूक ताकतीने लढतो.मी काय लेचापेचा लढत नाही किंवा मी तडजोड करत नाही
- मागच्या निवडणुकीत सर्व विरोधात होते. पक्षातले ही अधिकृत विरोधात होते. तरीही मी भाजप म्हणूनच निवडणूक लढणार
- दरम्यान भाजप आमदार आणि मावळते सभापती विजयकुमार देशमुख यांनी यंदाच्या निवडणुकीतून माघारी घेतल्याचे जाहीर केल आहे.
- मागील निवडणुकीत विजयकुमार देशमुख यांनी काँग्रेसच्या नेत्यांसोबत पॅनल बनवत सुभाष देशमुख यांच्याविरोधात निवडणूक जिंकली होती.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली