LOKSANDESH NEWS
चोपडा तालुक्यात रिकाम्या झालेले शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरणी सुरू
चोपडा तालुक्यात उन्हाळी हंगामातील शेतातील पीक काढणी झाल्यानंतर रिकामी पडलेल्या शेतात शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने खोल नांगरणी करताना दिसत आहे. या खोल नांगरणी केल्याने शेतातील जमिनीची उलटा पर्टी होत असते, तसेच शेतातील तणातील बी महिनाभर उन्हात तापलेल्या जमिनीमुळे नष्ट होत असते. त्याचबरोबर बुरशीचा प्रभाव कमी होत असतो,
जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात उन्हाचा पारा 44 ते 45 पर्यंत जात असल्याने खोल नांगरणीमुळे शेतातील जमिन लखलखत्या उन्हात शेकली गेल्याने पेरणीपूर्व शेती कामाला वेग येतो व पेरणीनंतर शेतात होणाऱ्या तणाच्या व बुरशीजन्य रोगाचा प्रभाव कमी होत असल्याने, शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतात खोल नांगरणी करून महिनाभर ऊन खाण्यासाठी सोडून देतो. जमिनीवर कुठलीही पेरणी करत नाही, पावसाळ्यातच शेती कामाला वेग येतो.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली