LOKSANDESH NEWS
देवगडचा हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल
रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंबा नांदेडमध्ये दाखल झाला. हापूस आंब्याचे स्टॉल विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत. हे आंबा खाण्यास अत्यंत चविष्ट असून, या आंब्याला साधारणता ९०० ते ९५० रुपये डझन असा भाव बाजारामध्ये सध्या मिळत आहे.
हा हापूस आंबा खरेदी करण्यासाठी नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कर्नाटकच्या आंब्याच्या तुलनेत हा आंबा अत्यंत गोड आहे.
कर्नाटकी आंब्याला म्हणावे तेवढी मागणी नाही, व भाव देखील कमी आहेत, तरी नांदेडकरांनी या देवगडच्या हापूस आंब्याला पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. दुकानदाराने नांदेडकरांना असे देखील आव्हान केले आहे की, एक वेळेस अवश्य आमच्या स्टॉलला भेट द्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली