पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाचा आक्रमक चेहरा आहेत त्यांना भाजपने मुख्यमंत्री केलं तर आम्ही स्वागत करु - तृप्ती देसाई
राज्यात पुरुष अत्याचाराच्या वाढत्या घटना दुर्दैवी आहेत. अशा घटना थांबवण्यासाठी राज्य सरकारने महिला आयोगाच्या धर्तीवर पुरुष हक्क आयोगाची स्थापना करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.
तृप्ती देसाई आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आल्या होत्या. दर्शना नंतर देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.अलीकडच्या काळात पुरुषांवरील होणाऱ्या अत्याचार आणि अन्यायाचा घटना वाढल्या आहेत. या संदर्भात देसाई या विचारले असता त्यांनी पुरूष हक्क आयोगची मागणी केली आहे.
राज्यातील अनेक महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. परंतु आता पर्यंत महाराष्ट्रात महिलेला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाचा आक्रमक चेहरा आहेत. भाजपने पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री पद दिले तर आम्ही महिला म्हणून भाजपचे स्वागत करू असं ही देसाई यांनी म्हटले आहे.