मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमास धडक देवून गंभीर जखमी करुन, मृत्युस कारणीभुत झालेल्या अज्ञात वाहन चालकास (हिट अॅन्ड रन) अवघ्या १० तासात काळेपडळ पोलीसांनी केले अटक "

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमास धडक देवून गंभीर जखमी करुन, मृत्युस कारणीभुत झालेल्या अज्ञात वाहन चालकास (हिट अॅन्ड रन) अवघ्या १० तासात काळेपडळ पोलीसांनी केले अटक "

LOKSANDESH NEWS 



मॉर्निंग वॉक करणाऱ्या इसमास धडक देवून गंभीर जखमी करुन, मृत्युस कारणीभुत झालेल्या अज्ञात वाहन चालकास (हिट अॅन्ड रन) अवघ्या १० तासात काळेपडळ पोलीसांनी केले अटक "




दिनांक ०१/०४/२०२५ रोजी सकाळी ०६/३० ते ०८/०० वा. चे दरम्यान न्याती ईबोनी सोसायटीजवळ, उंड्री, पुणे येथे मॉर्निंग वॉककरीता गेलेल्या एका इसमास अज्ञात वाहन चालकाने धडक देवून गंभीर जखमी करुन अपघात स्थळी न थांबता पळून गेला असल्याची नियत्रंण कक्ष कडुन कॉल प्राप्त होताच लागलीच काळेपडळ पोलीसांनी जखमी इसम नामे सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग, वय ४९ वर्षे, रा. बी/५, विद्यानिकेतन, हांडेवाडी रोड, होंडा सर्विस सेंटरच्या मागे, उंड्री, पुणे यास तात्काळ अॅम्ब्युलन्सने ससुन हॉस्पीटल येथे उपचारासाठी पाठविले असता, त्यास डॉक्टरांनी तपासणी करुन मयत घोषित केले असुन अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने काळेपडळ पोलीस ठाणे कडील तपास पथक ०२ टिम नियुक्त करुन, घटनास्थळाच्या आजुबाजुचे ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एक टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडी घटनास्थळा वरुन जाताना दिल्याने, तात्काळ आरटीओ विभागाकडुन मागील २ महिन्यात नवीन रजिस्टर नोंदणी असलेल्या टाटा नेक्सॉन ग्रे रंगाची गाडीबाबत २५०० नवीन नेक्सॉन वाहनाची माहिती प्राप्त करुन, प्राप्त वाहन क्रमांकाचे तांत्रीक विष्लेशन करुन, गाडीचे मेक व नंबरची खात्री करून पुन्हा उंड्री, महंमदवाडी, हांडेवाडी रोड येथील परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन, पोलीस अंमलदार शाहिद शेख व अतुल पंधरकर यांनी केलेल्या सीसीटिव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणावरुन अपघात केलेल्या गाडीचा नंबर एमएच १२ एक्सएच ५४३४ असा असल्याचे निष्पन्न करुन, अवघ्या १० तासात सदर गाडी मालकाचा शोध घेवून त्यास ताब्यात घेवुन, अधिक तपास करता सदर आरोपीने गुन्हयातील टाटा नेक्सॉन या गाडीचे दोन्ही साईटचे नंबर प्लेट काढुन ती औताडेवाडी पुणे येथील निर्जनस्थळी लपवुन ठेवण्याचे तपासात निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणी जावुन, सदर गुन्हयातील गाडी ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हयात अटक केलेल्या इसमाचे नाव समीर गणेश कड, होलेवस्ती, उंड्री, पुणे असे आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल निंबाळकर हे करीत आहेत.


सदरची कामगिरी ही डॉ. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक अमित शेटे, यांनी, करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.



  लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली