LOKSANDESH NEWS
जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रामपंचायत सदस्यांना दणका, १,३६५ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
- ग्रामपंचायत मध्ये निवडून आल्यानंतर एका वर्षाच्या आत, जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. मात्र निवडून आल्यानंतर प्रमाणपत्र सादर करण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
ग्रामपंचायत निवडणूक लढवून, त्यात विजय मिळविला, परंतु निवडून आल्यानंतर एका वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने, जिल्ह्यातील तब्बल १,३६५ ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दणका दिला आहे.
या सर्व सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली