दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन

                                                        LOKSANDESH NEWS 




                    दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आंदोलन





 पुण्यातील दीनानाथ मंगेशकररुग्णालयावर गंभीर आरोप झाले असून, उपचारासाठी आधी दहा लाख रुपये भरण्याची अट घातल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे त्या महिला या भाजप आमदार अमित गोरखे यांचे पीए सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या.

 तरीही रुग्णालयाने वेळेवर उपचार दिले नाहीत. त्यामुळे पोटात जुळी लेकरं असलेल्या गर्भवती महिलेवर केवळ पैसे भरले नाहीत म्हणून उपचार न करणाऱ्या, तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या कारभाराचा तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आले. 

यावेळी रुग्णालयाविरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच रुग्णालयाला चिल्लर देखील देण्यात आली.


 लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली