धुळ्यातील महिलेचे लाखोंचे दागिने लांबवणाऱ्या भामट्याला कर्नाटकात बेड्या, दोन लाख तीन हजारांचे दागिने जप्त
पुणे ते धुळे लक्झरी बसने प्रवास करणाऱ्या धुळ्यातील शोभा जगतसिंग राजपूत या महिलेचे दागिने प्रवासात चोरट्यांनी लांबवल्याची घटना गत मार्च महिन्यात घडली होती. धुळे शहर पोलिसात याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
धुळ्यातील संगीतम ट्रॅव्हल्स ने प्रवास करीत असताना कर्वे पुतळा, कोथरूड ते धुळे दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील चष्म्याच्या प्लास्टीक बॉक्समधील सोन्याची मंगलपोत, सोन्याचा राणीहार, सोन्याच्या अंगड्या, कानातील कर्णफुल, नथनी आदी लाखोंचे दागिणे लांबवले होते. या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आपली तपासाची चक्र फिरवत संशयित आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून दोन लाख दोन हजार पाचशे रुपये किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी यावेळी दिली.