LOKSANDESH NEWS
कोकणात अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम! शेतकरी चिंतेत
कोकणात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम आंब्यावर दिसू लागलाय.
आंब्यावरती डाग पडल्याने आंब्याच्या बाजार भावावर परिणाम झालाय. तर दुसरीकडे असलेले ढगाळ वातावरण यामुळे आंब्यावर किड रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी आणि त्यात पडलेला अवकाळी पाऊस यामुळे आंबा बागायतदार अडचणीत सापडला आहे. शासनाने आंबा बागायतदारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली