परिवहन विभागाच्या माध्यमातून ई- बाईक, टॅक्सीच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे - प्रताप सरनाईक
ऑन ई- बाईक /टॅक्सी
- परिवहन विभागाच्या माध्यमातून ई- बाईक टॅक्सीचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळाच्या मान्यते करता ठेवण्यात आला होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांनी ई- बाईक टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये परवानगी दिलेली आहे
- सिंगल व्यक्तीला खाजगी वाहनांना दुप्पट तिप्पट जे भाड द्यावं लागतं होतं, ते न देता आता ई- बाईक टॅक्सीच्या माध्यामांतून प्रवाश्यांना पुर्ण महाराष्ट्रात बाईक टॅक्सीचा प्रवास कुठेही करता येईल
- 15 किलोमीटरपर्यंत अंतर मर्यादीत ठेवलेलं आहे
- 50 बाईक एकत्र घेणाऱ्या संस्थेला ती परवानगी देण्यात येईल
- महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली नियमावली तयार केलेली आहे
- पावसाळ्यात सुरक्षित प्रवास होण्यासाठी कव्हर बाईक, ई-टॅक्सी उपलब्ध करुन दिली जाणार आहे हे धोरण राज्यशासनाने ठरवलेलं आहे
- प्रवाश्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही खुप उपाय योजना केलेल्या आहेत
- फक्त इलेक्ट्रीक वाहनांना प्रमोट करण्याच्या दृष्टीकोनातून ई- बाईक, टॅक्सी ला परवानगी दिलेली आहे
- महाराष्ट्र प्रदुषण मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ही त्याची सुरुवात आहे
- प्रवाश्यांना कमीत कमीत पैशात सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील
- ई बाईक टॅक्सी जर रिक्षावाल्यांच्या मुला मुलीने घेतली तर त्यामध्ये 10 हजार रुपये आम्ही अनुदान देणार आहोत
- दहा हजार पेक्षा जास्त रोजगार मुंबईत निर्माण होतील आणि महाराष्ट्रात 20 हजार
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली