LOKSANDESH NEWS
वक्फ सुधारणा विधेयक मंजूर, भाजपच्या अल्पसंख्याक कमिटीचा जल्लोष
लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विद्येकाला मंजुरी मिळाल्यानंतर साकी नाक्यात मुस्लिम बांधवांकडून लाडू , शिरखुरमा वाटून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
हातात शुक्रिया मोदी भायजान असे फलक घेऊन मुस्लिम बांधवानी मोदींचे आभार मानले आहे. या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
या वेळी एकमेकांच्या गळा भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. पंतप्रधान मोदी यांच्यामुळे सर्व सामान्य मुस्लिम बांधवांना फायदा होईल अशी प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी दिली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली