LOKSANDESH NEWS
देशी दारूचे दुकान ग्रामपंचायत हद्दीतून हलवण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
देशी दारूचे दुकान ग्रामपंचायत हद्दीतून हटवण्याच्या मागणीसाठी नांदेडच्या बळीरामपूर येथील गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. मागील एका बर्षापासून गावातील देशी दारूचे दुकान हटवण्याची मागणी हे गावकरी करीत आहेत.
या देशी दारूच्या दुकानामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. दारू पिऊन अनेक जण गुन्हेगारी कडे वळत असून, अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत.
त्यामुळे गावातील देशी दारूचे दुकान बळीरामपूर या गावातून इतर ठिकाणी हलवण्यात यावे, अशी गावाकऱ्यांची मागणी आहे. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग मात्र या गावाकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावाकऱ्यांनी केलाय. दरम्यान, नांदेड शहरा लगत असलेल्या चंदासिघ कॉर्नर येथे गावाकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या रास्ता रोको आंदोलनात गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली