सोमनाथ सूर्यवंशी च्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर ३०२ गुन्हा दाखल करावा - नवनाथ वाघमारे
बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांना ज्याप्रकारे मारहाण करून त्यांचा जीव घेतला, त्याच प्रकारे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या वकिलाचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करून जीव घेतला त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करावा, आणि त्यांना अशीच शिक्षा द्यावी, अशी मागणी आहे.
ज्याप्रमाणे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मागत आहोत, त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी च्या मारेकऱ्यांना देखील कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बहुजनांनी खुर्चीवर बसवले आहे, त्यांनी त्याचा आदर ठेवावा. आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी.
अशी मागणी नवनाथ वाघमारे यांनी केले आहे.