नंदुरबार जिल्ह्यात तापमान वाढीमुळे भाजीपाल्याची आवक घटली, परिणामी भाज्यांचे दर वधारले
जिल्ह्यातील वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच ढगाळ वातावरण व हवामान बदलांमुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली असून, परिणामी बाजारात दर वाढले आहेत. नंदुरबार शहराचे सध्याचे तापमान हे 38 ते 40 डिग्री सेल्सियस च्या आसपास आहे.
या तापमानाचा फटका भाजीपाला उत्पादनावर झाला आहे परिणामी भाजीपाल्याचे उत्पन्न कमी झाल्यामुळे दर वाढले आहे सद्या बाजारात भाज्यांचे दर 80 ते 100 रुपये किलोच्या आसपास आहे. भाववाढ गेल्या आठवड्यापासूनच सुरू झाली आहे.
आता एप्रिल महिना सुरू आहे अजून 2 ते 3 महिने तापमान वाढ अशीच राहील परिणामी भाजीपाला आवक कमी प्रमाणात होणार असल्यामुळे 2 ते 3 महिने दरवाढ अश्याच प्रकारची राहणार असल्याचे भाजी विकेत्यांनी सांगितले आहे. परिणामी या परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर भार पडत आहे. विशेषतः गृहिणींच्या घरगुती बजेटवर याचा परिणाम होत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली