उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी कशी घ्यावी? नेत्ररोग तज्ज्ञ यांचा सल्ला
उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे आणि उन्हाच्या झळा माणसांला बसायला लागल्या आहेत. तप्त उन्हाच्या झळांमुळे आरोग्याच्या विविध समस्या भेडसावत आहेत.
अशातच माणसाच्या शरीरात डोळा हा नाजूक अवयव असल्याने त्याची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हामुळे डोळ्यांत चिकटपणा, आग होणे, डोळ्यांतून पाणी गळण्याच्या समस्या दिसून येत आहेत. अशावेळी डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. कुणाल कुकवास यांनी दिला आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की, उन्हात बाहेर जाताना चांगला गॉगल वापरावे तसेच शरीरात पाण्याची कमतरता भासू नये त्याकरिता जास्तीत जास्त पाणी, ताक आणि पाणीयुक्त फळे खावे, शरीरात पाण्यासोबतच सकस आहार सुद्धा घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. सोबतच डोळ्यात खाज येणे किंवा पाणी येणे असा त्रास असल्यास इतरत्र औषध न घेता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही त्यांनी सांगितले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली