LOKSANDESH NEWS
शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम
शासनाच्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत येवला शहरातील प्रशासकीय संकुलात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपालिका, पंचायत समिती कार्यालयातील जवळपास 300 कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
यावेळी प्रशासकीय संकुल परिसर स्वच्छता करण्यात आली. यावेळी प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी या अधिकाऱ्यांसह शासकीय कर्मचारी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली