खामगाव शेगाव रोडवर बस, ट्रॅव्हल्स, व बोलेरो चा तिहेरी अपघात
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर एक तिहेरी अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहे.
तर तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खाजगी प्रवासी बस एसटी बस आणि बोलेरो या तीन वाहनामध्ये हा भीषण अपघात झालाय. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेचारच्या सुमारास भरधाव बोलेरो कार एसटी बसवर धडकली. त्यानंतर पाठीमागून येणारी इंदानी ट्रॅव्हल्स ही उभ्या असलेल्या एस टी बसवर धडकली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतकांसह जखमींना बाहेर काढले. उपविभागीय अधिकारी (महसुल) डॉ.रामेश्वर पुरी सह अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा घटनास्थळी पोहोचले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली