तालुका पोलिसांनी गांजा तस्करी रोखली, वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तालुका पोलिसांनी गांजा तस्करी रोखली, वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

                                                          LOKSANDESH NEWS 



                   
   तालुका पोलिसांनी गांजा तस्करी रोखली, वाहनासह लाखोंचा मुद्देमाल जप्त


  शिरपूर कडून पुण्याच्या दिशेने चार चाकी वाहनातून होणारी गांजा तस्करी धुळे तालुका पोलिसांनी रोखली असून, 6 लाख 82 हजार रुपये किमतीचा 31 किलो गांजा व 3 लाख रुपये किमतीची स्विफ्ट गाडी असा एकूण 9 लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल धुळे तालुका पोलिसांनी हस्तगत केला आहे.

 शिरपूरच्या वाहन चालक कालूसिंग पावरा याला ताब्यात घेत गजाआड केले आहे. मुंबईच्या एका पथकाने काही दिवसांपूर्वीच शिरपूर मध्ये छापा टाकत गांजा उध्वस्त केला होता. मात्र, तरी देखील गांजा तस्करीच शिरपूर कनेक्शन समोर आल्याने पुन्हा एकदा शिरपूर तालुका चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. 

   कालूसिंग तेरसिंग पावरा, वय 38 वर्ष रा. रूपसिंग नगर, आंबा तालुका शिरपूर जिल्हा धुळे असे ताब्यात घेतलेल्या चार चाकी वाहन चालकाचे नाव असून, त्याच्या विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सदरचा माल कुठे घेऊन चालला होता? याचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे. परिविक्षादीन पोलीस उपआधीक्षक सागर देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तालुका पोलिसांच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर कारवाई करण्यात आली.


  लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली