मुलुंडच्या एमटी अग्रवाल रुग्णालयाच्या खाजगीकरणाविरोधात टी प्रभाग कार्यालयाबाहेर महाविकास आघाडी तर्फे निदर्शन
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुलुंड च्या एमटी अग्रवाल रुग्णालयाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु, आता हे रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
या रुग्णालयाचे नूतनीकरण झाल्यानंतर हे रुग्णालय एका खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा घाट पालिका प्रशासनाकडून घातला जाणार आहे. ज्याच्या विरोधात महाविकास आघाडीने आज मुलुंड येथील टी प्रभाग कार्यालयाबाहेर निदर्शन केले.
मुंबई आणि उपनगरांमध्ये अशा प्रकारे पालिका रुग्णालयांचे खाजगीकरण करण्याचा प्रयत्न फोल ठरला आहे. त्यामुळे जर या रुग्णालयाचे खाजगी संस्थेला हस्तांतरण करू नये, अशी मागणी यावेळी महाविकास आघाडी तर्फे करण्यात आली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली